|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 1 नोव्हेंबरच्या खटल्याची सुनावणी आज

1 नोव्हेंबरच्या खटल्याची सुनावणी आज 

प्रतिनिधी/ बेळगाव

सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जातो. त्या दिवशी म. ए. समितीच्यावतीने सायकलफेरी काढण्यात येते. ही सायकलफेरी भव्य प्रमाणात असते. 1 नोव्हेंबर 2016 रोजी ही फेरी काढण्यात आली होती. या फेरीमध्ये मोठय़ा प्रमाणात मराठी भाषिकांनी भाग घेतला होता. त्यामुळे पोटतिडकीने मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. याचबरोबर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या खटल्याची सुनावणी बुधवार दि. 9 रोजी होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ऍड. महेश बिर्जे यांनी केले आहे.

सायकलफेरीवेळी पोलिसांनी जाणूनबुजून मराठी भाषिकांना मारहाण केली. याचबरोबर गुन्हे दाखल केले. दत्ता मनोज येळ्ळूरकर (वय 25, रा.गांधीनगर), रामचंद्र बाबुराव पाटील (वय 46, रा. पाटील गल्ली, वडगाव), यशोधन महादेव नेसरकर (वय 20, रा. होसूरकरमठ गल्ली, बेळगाव), सचिन चंद्रकांत कदम (वय 19), महेश उर्फ पिंटू परशराम पाटील (वय 30, रा. खासबाग), अंकुश शिवाजी बाळेकुंद्री (वय 20, रा. मच्छे), शन्मुख शंकर चोपडे (वय 25, रा. कचेरी गल्ली, शहापूर), संतोष रविंद्रकर मुचंडीकर (वय 20, रा. पिरनवाडी), भुजंग महादेव लाड (वय 24, रा. कचेरी गल्ली, मच्छे), चांगदेव रविशंकर मुचंडीकर (वय 26, रा. गणपत गल्ली, मच्छे), सतीश मनोहर कुगजी (वय 30, रा. शिवाजी रोड येळ्ळूर), रोशन महेश पाटील (वय 20), राहुल जयंत कुरणे (वय 29, दोघेही रा. खासबाग), राघवेंद्र प्रकाश येळ्ळूकर (वय 36, रा. मुजावर गल्ली), संदीप विश्वनाथ मोटेकर (वय 39, रा. मुजावर गल्ली), राहुल मदन पाटील (वय 28, रा. पाटीलमळा), गजानन आनंद पोटे (वय 30), बाळू रामचंद्र जमादार (वय 51), सुरज रामा शिंदोळकर (वय 32, सर्व रा. कोनवाळ गल्ली), रवी बाबु मिरजकर (वय 28, रा. गणपत गल्ली, बेळगाव), श्रीकांत भाऊ मास्तमर्डी (वय 26), राजू पांडुरंग मजुकर (वय 30), जयदीप मोहन उपाशीकर (वय 28), राजू महादेव  हित्तलमनी (वय 25), स्वप्नील सदानंद देसाई (वय 21), बाबु विजय भडांगे (वय 34, सर्व रा. मजगाव), श्रीकांत बाळकृष्ण कदम (वय 28, रा. नाथ पै सर्कल, शहापूर), श्रीनिवास कृष्णा पोळ (वय 38, रा. आनंदवाडी, शहापूर), सचिन कृष्णा पाटील (वय 28), शंकर यल्लाप्पा जाधव (वय 34), इंद्रजित गणपती पाटील (वय 29), संदीप रमेश कडेमनी (वय 28, सर्व रा. कडोली), नारायण सिध्दाप्पा पाटील (वय 36, रा. गुंजेनहट्टी), विक्रम विष्णू मुतगेकर (वय 29), राहुल आनंद पाटील (वय 26), सुशांत परशराम रेडेकर (वय 22), किरण प्रकाश पिसे (वय 31, सर्व रा. कंग्राळी खुर्द), विठ्ठल भावकाण्णा पाटील (वय 51), संतोष यल्लाप्पा बांडगी (वय 35), मनोहर गंगाधर काकतकर (वय 47, सर्व रा. हलगा-बस्तवाड), यशोधन मारुती कंग्राळकर (वय 26, रा. भारतनगर), विजय गणपत घाटकर (वय 29, रा. जोशी गल्ली, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत.

या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात सुरु आहे. या पूर्वी या खटल्यामध्ये शहापूर पोलिसांनी मारहाण केली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र अजून नोटीसीला उत्तर देण्यात आले नाही. बुधवारी तारीख असल्याने त्या दिवशी तरी नोटिसीला उत्तर देणार की नाही हे समजणार आहे.