|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबा परिषदेत 312 शास्त्रज्ञ सहभागी

आंबा परिषदेत 312 शास्त्रज्ञ सहभागी 

विदेशातील 40 शास्त्रज्ञांचा समावेश वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात आयोजन

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेची सुरुवात मंगळवारीजागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थितीया विषयावरील चर्चासत्राने करण्यात आली. या सत्राचे उद्घाटन ऑस्ट्रेलियातील चार्ल डार्विन युनिव्हर्सिटीचे डॉ. पिग्लू यांच्या हस्ते झाले. या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेस देशातील 272, तर विदेशातील 40 नामवंत शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.

इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर ऍडव्हान्समेंट आँफ ऍग्रीकल्चरल सायन्सेस ऍण्ड टेक्नॉलॉजी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन 11 मेपर्यंत करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन जागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थिती या विषयावरील चर्चासत्राने करण्यात आले.

यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे, कॅनरी आयलँड कृषी संशोधन संस्था स्पेनचे डॉ. व्हिक्टर गॅलन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उप महानिरीक्षक डॉ. . के. सिंग, रिलायन्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष रा. ता. गुंजाटे, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंदाचे माजी सहयोगी संचालक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. जयसिंग रजपूत, डॉ. बी. आर. साळवी देशातील 272 विदेशातील 40 मिळून एकूण 312 शास्त्रज्ञ उपस्थित होते.

या परिषदेचे औचित्य साधून परिषदेस उपस्थित असलेले कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी विद्यार्थी गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांचा सत्कार डॉ. व्हिक्टर गॅलन यांच्या हस्ते करण्यात आला. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रात कृषी पर्यटनास फार मोठा वाव आहे. गोवा महाराष्ट्राने बरोबरीने, एकमेकांच्या सहकार्याने कृषी पर्यटनाद्वारे या भागाचा विकास साधावा. त्यासाठी गोवा राज्याचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही यावेळी विजय सरदेसाई यांनी दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे उत्तम दर्जाचे विद्यापीठ असून तेथे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण कृषिमंत्री झालो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज जागतिक पातळीवरील आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्राs व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्रे झाली. 9 मे रोजी शाश्वत कृषी उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान यांत्रिकीकरण कृषी विषयावरील खास सादरीकरण होणार आहे.

आंबा निर्यात व्यापारीकरणावर आज सादरीकरण

आंब्याची जागतिक स्तरावरील सद्यस्थिती, जागतिक स्तरावरील वातावरणातील फरक आणि त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम, आंब्यातील आनुवंशिकता, आंब्याच्या शाश्वत उत्पादनाकरिता कृषी तंत्रज्ञान, आंबा शेतीमधील तंत्रज्ञान या विषयावरील सादरीकरण झाले. 10 मे रोजी आंब्याची निर्यात व्यापारीकरण या विषयावर प्रगतशिल शेतकरी निर्यातदार डॉ. अजित शिरोडकर डॉ. मिलिंद जोशी यांची सादरीकरणे होणार आहेत.

पहिल्या सत्रात आंब्याची जागतिक स्तरावरील सद्यस्थिती या विषयाचे प्रमुख सादरीकरण डॉ. व्हिक्टर गॅलन यांनी केले. दुसऱया सत्रात जागतिक स्तरावरील वातावरणातील फरक त्याचा आंबा उत्पादनावर होणारा परिणाम या विषयाचे पूरक सादरीकरण झाले. चार्ल्स डार्विन विद्यापीठ ऑस्टेलियाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पिंग लू आणि चियांग माई विद्यापीठ थायलंडच्या डॉ. श्रीमती दारुनी नेफ्रान यांनी केले. तिसऱया सत्रात आंब्यातील अनुवंशिकता प्रजोत्पादन या विषयावरील प्रमुख सादरीकरण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. विद्या गुप्ता यांनी केले. याच सत्रात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत साळवी यांनी सादरीकरण केले.

9 मे रोजीच्या पहिल्या सत्रात आंब्याच्या शाश्वत उत्पादनाकरीता कृषी तंत्रज्ञान या विषयाचे प्रमुख सादरीकरण जागतीक कीर्तीचे शास्त्रज्ञ रिलायन्स उद्योग समूह जामनगरचे माजी उपाध्यक्ष डॉ रा. ता. गुंजाटे यांनी केले. याच सत्रात तामिळनाडू कृषी विद्यापीठ कोईमतुरचे अधिष्ठाता डॉ. एन. कुमार यांचेही सादरीकरण झाले. आंबा शेतीमधील यांत्रीकीकरण या विषयावरील सादरीकरण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटेश मायंदे यांनी केले. तिसऱया सत्रात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. यशवंत खांदेतोड यांचेही सादरीकरण झाले.

10 मे रोजी पहिल्या सत्रात आंब्याचे निर्यात व्यापारीकरण या विषयावर प्रगतशिल शेतकरी निर्यातदार डॉ. अजित शिरोडकर आणि राज्य पणन बोर्डचे सरव्यवस्थापक डॉ. मिलिंद जोशी यांची प्रमुख सादरीकरण होणार आहेत. समारोपाच्या सत्रात विविध सत्रात दिल्या गेलेल्या शिफारशीचे सादरीकरण करण्यात येणार असून यावेळी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत.

Related posts: