|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » रेऑनिक, शापोव्हॅलोव्ह, डेल पोट्रो विजयी

रेऑनिक, शापोव्हॅलोव्ह, डेल पोट्रो विजयी 

वृत्तसंस्था/ माद्रिद

माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत मिलोस रेऑनिक, डेनिस शापोव्हॅलोव्ह, जुआन मार्टिन डेल पोट्रो यांनी तिसरी फेरी गाठली तर तिसरा मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हचे आव्हान संपुष्टात आले.

कॅनडाच्या रेऑनिकने डिमिट्रोव्हला 7-5, 3-6, 6-3 असा पराभवाचा धक्का देत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याचाच देशवासी शापोव्हॅलोव्हशी त्याची पुढील लढत होईल. शापोव्हॅलोव्हने फ्रान्सच्या बेनोई पेअरवर 7-6 (7-5), 4-6, 6-4 अशी मात केली. ब्रिटनच्या काईल एडमंडने रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हचा 6-4, 6-0 असा पराभव केला. दुसऱया फेरीत त्याची लढत नोव्हॅक ज्योकोव्हिकशी होईल. अर्जेन्टिनाच्या जुआन डेल पोट्रोने बोस्नियाच्या दामिर झुमहुरचा 6-3, 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. दुसान लॅजोविकशी त्याची पुढील लढत होईल.

क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकने नवव्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टाला 6-4, 6-2 असा पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. दुसऱया सेटवेळी बोर्ना 5-2 असे आघाडीवर असताना पाऊस आला. त्यामुळे 40 मिनिटानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला होता. हॉलंडच्या रॉबिन हॅसने चार पराभवांची मालिका खंडित करीत कारकिर्दीतील 200 वा विजय मिळविला. त्याने द.कोरियाच्या चुंग हेऑनचा पहिल्या फेरीत 6-2, 6-0 असा पराभव केला.