|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » माझ्या आईने मोठा त्याग केला : राहुल गांधी

माझ्या आईने मोठा त्याग केला : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम/ बंगळुरू :

माझी आई इटालियन आहे.पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घावला आहे.अनेक भारतीयांपेक्ष ती जास्त भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे. असे व्यक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरूत पत्रकारांशी बोलताना केले.

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवदचा दिवस आहे. यानिमित्तने पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मांदी, केंद्र सरकार आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 15 मिनिटे मातृभाषेत बोलण्याच्या पंतप्रधानांच्या आव्हानावरही राहुल गांधींनी अत्तर दिले. यावेळी बोलतान त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला

मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान कर्नाटकमधील जनतेच्या मुद्यांवर बोलत नाहीत, तर त्यांची दिशाभूल करत आहेत. ते बुलेट टेन, सी प्लेनच्या गोष्टी करतात. तर शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षा, शेतीसाठी पाणी यांसारख्या सामान्यांच्या मुदद्यांवर मौन बाळगतात

 

पत्रकार परिषदेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याही उपस्थित होते. यादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या जनतेकडून फार काही शिकल्याचे म्हटले कर्नाटकात फिरुन आम्ही जनतेचं मत जाणून घेतलं आणि त्यांचा आवाज घोषणापत्रात सामील केला. भाजपने आपल्या घोषणापत्राची कॉपी केली आहे, असा दावा त्यांनी केला.

 

 

 

 

Related posts: