|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेत घर बसल्या खाते उघडता येणार

स्टेट बँकेत घर बसल्या खाते उघडता येणार 

वृतसंस्था / नवी दिल्ली

 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांच्यासाठी घर बसल्या खाते उघडता येण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. कमीत कमी रक्कम खात्यावर ठेवून खाते वापरता येण्याची सुविधा आता मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.  हे खाते डिजिटल स्वरुपात उघडण्यात येणार असून इस्टा सेव्हींग अकाऊंट बँक डिजिटल खाते घरातूनच उघडण्यासाठी योनो ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपच्या माध्यमातून खातेदाराना आपले खाते उघडता येणार आहे. ही योजना काही मर्यादीत कालावधीसाठी असल्याचीही माहिती बँकेकडून देण्यात आली.

कमीत कमी खात्यावर रक्कम ठेवल्यास खातेदाराना कोणताही दंड करण्यात येणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

पेपरलेस खाते उघडता येणार

रुपेचे डेबिट कार्ड मिळणार

1 लाखा पर्यत रक्कम खात्यावर ठेवता येणार

वर्षाकाठी 2 लाखा पर्यत व्यवहार करता येणार

1 वर्षापर्यत नियमित सेव्हीग खात्यात रुपातर करणयात येण्याची सुविधा