|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘मेक इन सोलापूर’ संकल्पना राबवणार

‘मेक इन सोलापूर’ संकल्पना राबवणार 

सहकारमंत्री  सुभाष देशमुख : सोलापूरचे नाव जगभर लौकीक करण्याचा संकल्प

नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडीया, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना राबवून विकासाचा ध्यास घेतला आहे. याच धर्तीवर सोलापूरचे नाव जगभरात लौकीक करण्यासाठी सोलापुरातील 40 लाख नागरिकांची मदत घेवून सोलापुरात ‘मेक इन सोलापूर’ ही संकल्पना राबवणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितली. सोलापूरचा विकास करण्यासाठी देशमुख यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना लवकरच करणार आहेत. त्यासंदर्भात शुक्रवारी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सहकारमंत्री बोलत होते.

 सहकारमंत्री म्हणाले, सोलापूरचे जे बलस्थान आहेत. त्यामध्ये अध्यात्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर याचे मार्केटींग करण्यासाठी पुढे काम करणार असून यासाठीच सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. सोलापूरचे नाव राज्य, देशात नव्हेतर पूर्ण जगभरात मार्केटींग करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी सोलापुरातील उद्योगकर्त्यांचे विचार, सोलापूकरांची कल्पना, वेळ द्यावा जेणेकरून सोलापूरचे नाव लौकीक होईल, असेही सहकारमंत्री देशमुख सांगितले.

   सोलापुरात लवकरच सोलापूर सोशल फाउंडेशनचे कार्यालय सुरू करणार असून ही संस्था कोणतेही व्यवसायीकरणाचा हेतू नसून सोलापूरचे विकास हा एकच ध्यास असणार आहे. यासाठी सोलापुरातील 40 लाखांनी यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इतर शहरात ‘सोलापूर महोत्सव’ घेणार

 सोलापुरातील धार्मिक पर्यटन, मेडिकल हब, शैक्षणिक हब, याचबरोबर सोलापुरातील चादर, चटणी, इतकेच नाही तर सोलापुरातील हुरडा याचाही प्रचार सोलापूरच्या उत्सवाच्या निमित्तान मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरात सोलापूर महोत्सव घेण्यात येणार आहे. सोलापूरचे नाव सर्वत्र होईल या अनुषंगाने हा महोत्सव घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, देशभरात सोलापूचे नाव होण्यासाठी प्रयत्न करणार.

Related posts: