|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » स्मार्टफोनमध्ये शाओमी, 4जी हेडसेटमध्ये जिओ अव्वल

स्मार्टफोनमध्ये शाओमी, 4जी हेडसेटमध्ये जिओ अव्वल 

स्मार्टफोन क्षेत्रात चिनी कंपन्यांचे वर्चस्व कायम : सॅमसंग दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील स्मार्टफोन क्षेत्रामध्ये चांगला विस्तार होत आहे. 2018 च्या मार्च तिमाहीमध्ये 3 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली. देशातील स्मार्टफोन बाजारामध्ये शाओमीचा हिस्सा 30.3 टक्क्यांसह पहिला असून यानंतर 25.1 टक्क्यांसह सॅमसंग दुसऱया स्थानी असल्याचे इन्टरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.

देशातील 4जी फिचर फोन बाजारात तिमाहीच्या आधारे 50 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धी होत आहे. या क्षेत्रात रिलायन्स जिओफोनची हुकूमत असून बाजारहिस्सा 38.4 टक्के आहे. रिलायन्स जिओकडून 49 रुपयांचा डेटा प्लॅन सुरू करण्यात आल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार देशातील स्मार्टफोन विक्रीमध्ये वर्षाच्या आधारे 11 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली.

ऑनलाईन विक्री करण्यामध्ये शाओमीचा हिस्सा गेल्या वर्षीच्या 32 टक्क्यांवरून मार्च तिमाहीअखेरीस 53 टक्क्यांवर पोहोचला. शाओमीकडून विभिन्न क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विक्रीमध्ये वाढ दिसून आली. देशातील स्मार्टफोन क्षेत्रामध्ये सलग दुसऱया तिमाहीमध्ये शाओमीचे वर्चस्व आहे. ऑफलाईन क्षेत्रात विस्तार आणि रेडमी 5ए आणि रेडमी नोट 5 या स्मार्टफोनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कंपनीची विक्री वाढली.

सॅमसंगकडून अल्प ते मध्यम रेन्जमधील जे सीरिज आणि गॅलक्सी एस9, गॅलक्सी एस8 आणि नोट 8 यासारख्या प्रिमियम प्रकारावर लक्ष देण्यात येत आहे.  गेल्या तिमाहीच्या पाचव्या स्थानावरून ओपो तिसऱया स्थानी, तर विवो चौथ्या स्थानी घसरला.

Ÿढमेरा म्

भारत सरकारकडून पीसीबी, कॅमेरा मॉडय़ुल आणि कनेक्टर्सवर आयात शुल्क वाढवण्यात आल्याने स्मार्टफोन कंपन्यांवर दबाव आला आहे. देशात संपूर्ण उत्पादनासाठी प्रकल्प उभारण्यात येत नाही, तोपर्यंत काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. याचा सर्वाधिक फटका लहान कंपन्यांना बसणार आहे, असे आयडीसी इंडियाचे वरिष्ठ संशोधक उपासना जोशी यांनी सांगितले.