|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाफोलीत 86 हजारच्या दारुसह कार जप्त

वाफोलीत 86 हजारच्या दारुसह कार जप्त 

जिल्हा विशेष पोलीस पथकाची कामगिरी

प्रतिनिधी / बांदा:

बांदादाणोली मार्गावर गोव्याहून आंबोलीच्या दिशेने गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणाऱया अल्टो कारवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकांने वाफोली येथे कारवाई केली. या कारवाईत 86 हजार 400 रुपयांच्या दारुसह अडीच लाखाची कार असा एकूण तीन लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात गोवा बनावटीच्या सुमारे 960 बाटल्या ताब्यात घेतल्या. बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी नारायण संतोष वेंगुर्लेकर (रा. वैश्यवाडा, सावंतवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोव्यातून बांदादाणोली मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शाहनवाज मुल्ला यांना होती. त्यामुळे सकाळपासूनच त्यांना बांदा परिसरात ठाण मांडुन या गाडीच्या माघावर होते. सकाळी 10.30 वा. च्या सुमारास वाफोली येथे तपासणी करीत असता त्या ठिकाणी (एमएच 02 एनए 8533) गाडी आली असता थांबण्याचा इशारा दिला. गाडीची प्राथमिक तपासणी केली असता गाडीच्या मागच्या सीटवर गोवा बनावटीच्या दारुचे 20 खोके यात सुमारे 86 हजार 400 रुपयांच्या 960 दारुच्या बाटल्या होत्या. तर गाडीची किंमत अडीच लाख असा एकूण तीन लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. तर वाहनचालक नारायण संतोष वेंगुर्लेकर यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शाहनवाज मुल्ला, पो. कॉ. पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसोजा, विष्णू सावळ यांनी केली.