|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शौर्या आर्या प्रतिष्ठानच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण

शौर्या आर्या प्रतिष्ठानच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण 

कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शौर्या आर्या प्रतिष्ठान सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणाऱया आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिवाजी पेठेतील दत्ताजीराव माने विद्यालय येथे पार पडला. पुरस्काराचे यंदाचे हे 12 वे वर्ष आहे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र हणमंतराव भोईटे यांच्या हस्ते कोमनपा पी. बी. साळुंखे कन्या विद्यामंदिरची विद्यार्थिनी तेजस्विनी अमर बुचडे हिला आदर्श विद्यार्थिनी आणि कोमनपा दत्ताजीराव माने विद्यालयाचा आर्यन जगन्नाथ क्षीरसागर याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभिजित कदम होते.

याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल कुरणे, मुख्याध्यापिका सौ. गीता काळे, मिनाक्षी चौगुले, स्नेहल बरगे, बाळासाहेब साळवी, भगवान थोरात, अमजद मोमीन, महेश बुरूड, अक्षय साळवी उपस्थित होते.

Related posts: