|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपामध्ये आता चर्चा ‘स्थायी’ निवडीची

मनपामध्ये आता चर्चा ‘स्थायी’ निवडीची 

बेळगाव/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. महापौर निवडणुकीनंतर एकच बैठक झाली. यामुळे महापालिका सभागृहाच्या कामकाजाला कधीपासून प्रारंभ होणार? तसेच स्थायी समिती निवडणुका कधी? याबाबतच्या चर्चांना प्रारंभ झाला आहे.

महापौर-उपमहापौरांच्या कार्यकालावधीप्रमाणे स्थायी समित्यांची मुदत 1 वर्षाची असते. यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती निवडणुका घेऊन अध्यक्षांची निवड केली जाते. पण यावषी स्थायी समिती निवडणुका झाल्या नसल्याने या निवडणुका कधी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्थायी समिती निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण मागील वषी स्थायी समिती निवडणुका विलंबाने झाल्या होत्या. स्थायी समित्यांची मुदत दि. 1 जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर चारही स्थायी समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. अद्याप दीड महिन्याची मुदत स्थायी समित्यांना आहे. या कालावधीत 2 बैठका होण्याची शक्मयता आहे.

महापौर-उपमहापौर निवडणूक झालेल्या 20 दिवसांनंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. आचारसंहिता असल्याने बैठका घेऊन कोणत्याही प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत. यामुळे सभागृहाच्या बैठका झाल्या नाहीत. परिणामी महापालिका सभागृहाचे कामकाज तसेच महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणारी विकासकामे ठप्प झाली आहेत. विविध विकासकामांकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता आणि मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम रखडले होते. तसेच अन्य कामेदेखील अपूर्ण आहेत. ही सर्व कामे सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज सुरू होणे आवश्यक आहे. पण निवडणुकीचे काम मंगळवारी संपल्याने पुढील कालावधीत सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होण्याची शक्मयता आहे.

स्मार्ट सिटी योजनेचे कामदेखील मार्गी लागणार

महापालिकेच्या सभागृहासह स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामेही रखडली आहेत. स्मार्ट सिटे योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण दीड महिन्याच्या कालावधीत महापालिका आयुक्तांना निवडणुकीच्या कामामधून सवड मिळाली नाही. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीचे कामकाज संपल्याने स्मार्ट सिटी योजनेचे कामदेखील मार्गी लागण्याची शक्मयता आहे. 

Related posts: