|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार

बदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव न्यायालयातील बदली झालेल्या चार न्यायाधिशांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर, जनरल सेपेटरी प्रवीण अगसगी व इतर सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बेळगाव न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ जी. ए., वरि÷ दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश प्रतिभा कुलकर्णी, पाचवे जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश लक्ष्मी गानापूर, सहावे जेएमएफसी मंजुळा या सर्वांची बदली झाली आहे. त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ म्हणाले, बेळगावमध्ये काम करताना आम्हाला साऱयांचेच सहकार्य लाभले आहे. येथील वकिलांनी आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर बेळगावसारख्या ठिकाणी काम करताना आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला. त्याचबरोबर निसर्ग संपन्न असलेल्या या परिसरात साऱयांचेच सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी इतर न्यायाधिशांनीही आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात वकील उपस्थित होते.