|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इस्रायलच्या सैन्याकडून हमासवर हवाई हल्ले

इस्रायलच्या सैन्याकडून हमासवर हवाई हल्ले 

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

गाझाच्या हमास शहरात बुधवारी रात्री हवाई हल्ले घडवून आणल्याची माहिती इस्रायलने गुरुवारी दिली. गाझाकडून सैनिकांना लक्ष्य करत हल्ला करण्यात आल्यानंतर इस्रायलने हे प्रत्युत्तर दिले आहे.

गाझापट्टीच्या उत्तर भागातील हमासमध्ये हवाई हल्ले केले, यात दहशतवादी तळ आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आल्याचे सैन्याने सांगितले. तर पॅलेस्टाईनने हल्ल्यांची पुष्टी देत यात कोणीही जखमी झाले नसल्याचा दावा केला.

बुधवारी इस्रायलच्या रणगाडय़ांनी हमासच्या तीन तळांना लक्ष्य केले होते. गाझाकडून गोळीबाराच्या माध्यमातून इस्रायलच्या सैनिकांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.

दोन्हीबाजूने होणारे हे हल्ले गाझा सीमेवर मोठय़ा प्रमाणावर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर झाले आहेत. हिंसक निदर्शने रोखण्यासाठी इस्रायलच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 60 हून अधिक पॅलेस्टाईनचे नागरिक मारले गेले आहेत.

 गाझामध्ये इस्रायल आणि दहशतवाद्यांदरम्यान 2008 पासून तीनवेळा मोठा संघर्ष झाला आहे.

Related posts: