|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गुरुवारी पुन्हा पावसाची हजेरी

गुरुवारी पुन्हा पावसाची हजेरी 

बेळगाव / प्रतिनिधी

गुरुवारी पुन्हा पावसाचे आगमन झाले. दुपारीच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, काही वेळातच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाला. पूर्व भागात या पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसात वळिवाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले होते. या पावसामुळे शेती कामांना प्रारंभ झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याने बऱयापैकी उघडीप दिली होती. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे जाणवत होते. दुपारीच पावसाचे आगमन झाले. मात्र, केवळ पावसाचा शिडकावा झाला होता. पुन्हा सायंकाळी पावसाच्या सरी बऱयापैकी कोसळल्या आहेत.

या झालेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसामुळे बैठे व्यापारी आणि फेरीवाल्यांना चांगलाच फटका बसला. गुरुवारच्या पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी पूर्व भागातील गावांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. या झालेल्या पावसामुळे शेतातील कामे मात्र रेंगाळली आहेत. मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे शिवारातील बम व तण बऱयापैकी उगवले आहेत. त्याची कोळपण करणे आवश्यक आहे. त्यामुळे काही शेतकऱयांनी कोळपणीला सुरुवात केली होती. मात्र, आता पुन्हा पाऊस झाल्याने कोळपण करणे अवघड जाणार आहे.

सध्या शेतकरी बांधांवर माती टाकून बांध मजबूत करण्याच्या कामात गुंतला आहे. याच बरोबर शेणखत टाकणेला प्रारंभ केला आहे. पण आता पुन्हा पाऊस झाल्यामुळे ही सर्वच कामे रेंगाळली आहेत. कोळपणीनंतर भात पेरणीच्या कामाला शेतकरी लागणार आहे. पण सध्या पावसाचा शिडकावा सुरू असल्यामुळे भात पेरणी लांबणीवर पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. यावषी उशिराने पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवारातील कामांनाही विलंब होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.