|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » किरण पाटील यांच्या ‘गाणीच गाणी’ पुस्तकाचे प्रकाशन

किरण पाटील यांच्या ‘गाणीच गाणी’ पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ सरवडे

येथील उपक्रमशिल शिक्षक व साहित्यिक किरण पाटील यांच्या ’गाणीच गाणी’ पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यीक डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ बालसाहित्यीक बाबुराव शिरसाट होते.

डॉ. चंद्रकुमार नलगे म्हणाले, साहित्यीक किरण पाटील यांनी सातत्याने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यीक चळवळीतील त्यांची तळमळ स्तुत्य असून त्यांनी सृजन सारखी साहित्यीक, सामाजिक संस्था बारा वर्षे आदर्शवत चालवली आहे. ते सातत्याने नवनवीन समाजोयोगी साहित्य शोधत असतात. यावेळी बाबुराव शिरसाट, परशराम शिंदे यांची भाषणे झालीत.

किरण पाटील यांची आतापर्यत बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गाणीच गाणी हे बाल संग्रहाचे पुस्तक आहे. त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. स्वागत व प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. आभार अमित कांदळकर यांनी मानले.