|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रुग्णालयात धर्मशाळा कर्मचाऱयांनीच केली हायजॅक

रुग्णालयात धर्मशाळा कर्मचाऱयांनीच केली हायजॅक 

प्रतिनिधी/ सातारा

राज्य शासनाने राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी धर्मशाळा या संकल्पनेखाली रात्रीच्या सहाऱयाची सोय केली आहे. परंतु सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील धर्मशाळेचा वापर तेथील कर्मचारीच सर्रास करतात. या धर्मशाळेचा वापर गैरकामांसाठी होत असल्याचा प्रकार रात्री धर्मवीर युवा मंचने उघडकीस आणला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाने यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा अल्टिमेटम दिला आहे.

जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱयांचेही भलतेच लाड झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक हे काहीही करु शकत नाहीत. अशाच अविर्भावात राज्य शासनाने  रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरु केलेल्या धर्मशाळेमध्ये आपलेच प्रस्त वाढवले आहे. त्याचीच माहिती धर्मवीर युवा मंचला मिळाली. त्यांनी रात्री अकरा वाजता जिल्हा रुग्णालयात धर्म शाळेला भेट दिली. चक्क तेथे वेगळाच प्रकार पहायला मिळाला. डय़ुटीवर असलेले काही कर्मचाऱयांनी चक्क ताणून दिली होती. ज्या रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या या कर्मचाऱयांचे हे प्रताप पाहुन धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी त्यांना हा काय प्रकार चालवला आहे, अशी विचारणा केली असता लांडगे नामक कर्मचाऱयाने कोण सीएस, आम्ही ओळखत नाही, अशी उर्मट भाष्घ करताच धर्मशाळेच्या लावलेले दार उघडताच आतमध्ये बहुतांशी रात्रपाळीवर असलेले कर्मचारी निद्रेच्या आहारी गेल्याचे सापडले. त्यावरुन शिवसेना आणि धर्मवीर युवा मंचने सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

शासकीय रुग्नालयात असणारी धर्मशाळा ही बाहेरील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी असते. या ठिकाणी ज्या लोकांनी झोपयाचे असते ते सामान्य लोक लाइटच्या पोलखाली, शौचालय जवळ, अणि परिसरात नाइलाजस्तव झोपत आहेत. तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश बोराटे आदींनी दिला आहे.

Related posts: