|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लाक

मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लाक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरूस्तीच्या कारणासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

या मेगाब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून स. 9.25 ते दु. 2.54 कालावधीत डाऊन जलद आणि अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावरही थांबतील. ठाण्यापुढे सर्व जलद लोकल ठाणे आणि कल्याणमध्ये सर्व स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱया सर्व अप जलद आणि अर्धजलद लोकल सेवा स. 10.37 ते दु. 3.06 पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावरही थांबतील. या ब्लॉकमुळे लोकल सेवा सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांदे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. चुनाभट्टी/ वांदे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांदे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा रोडपासून वाशी/ बेलापूर/ पनवेल मार्गावरून सुटणाऱया सर्व गाड्या, तसेच सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 पर्यंत सीएसएमटीपासून वांदे/ अंधेरी/ गोरेगाव मार्गावरून सुटणाऱया गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी 9.53 ते दुपारी 3.20पर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीपासून सीएसएमटीला सुटणाऱया अप हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 वाजेपर्यंत अंधेरी/ वांदे/ गोरेगावपासून सीएसएमटीकडे अप हार्बर मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. दरम्यान, ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला मार्गावरून विशेष गाडय़ा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील सर्व प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल.

Related posts: