|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » कर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव्हीपॅडचा वापर

कर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव्हीपॅडचा वापर 

ऑनलाईन टीम / विजयपूर :

कर्नाटकातील सत्ता संघर्ष पूर्ण देशभरात गाजलेला पाहायला मिळाला. कुमारस्वामी देवेगौडा आता सत्ता स्थापन करणार आहेत. कर्नाटकातील निकालानंतर पुन्हा एकदा व्हीव्हीपॅडचा प्रश्न समोर आला आहे. व्हीव्हीपॅड बाबत एक खळबळजनक घटना विजयपूर जिल्ह्य़ात घडली आहे. एका मजुराच्या घरात तब्बल 8 व्हीव्हीपॅडचे कव्हर्स आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या कव्हर्सचा वापर हा कपडे ठेवण्यासाठी करत होते.

मजुराच्या घरी सापडलेल्या मशीन नसून व्हीव्हीपॅटचे कव्हर असल्याची माहिती पोलिसांना म्हटले आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचेही ते म्हणाले. या व्हीव्हीपॅटला बॅटरी नसल्याच्या वृत्तास पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. नुकताच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा 104 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. परंतु, बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अवघ्या 55 तासांत राजीनामा दिला. आता बुधवारी जेडीएस आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार सत्तेवर येईल. कुमारस्वामी देवेगौडा हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या आहेत.