|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » कुमारस्वामी आज दिल्लीत, सोनिया गांधींची भेट घेणार

कुमारस्वामी आज दिल्लीत, सोनिया गांधींची भेट घेणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधीसह ज्येष्ठ नेत्याची भेट घेणार आहेत. कुमारस्वामी हे बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

 जनता दल व काँग्रेसच्या वाटय़ाला किती मंत्रिपदे येणार, कोणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे कुमारस्वामी यांनी आज स्पष्ट केले. खातेवाटपाबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे माध्यमांनी विनाकारण तर्क लढवून दिशाभूल करू नये, असे आवाहन कुमारस्वामी यांनी केले. शपथ घेतल्यानंतर 24 तासांत बहुमत सिद्ध करू, अशी घोषणाच त्यांनी केली. बुधवारी शपथविधी होईल, गुरूवारी सभापती निवड व विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. शपथविधी विधानसौध परिसरात होईल अशी शक्मयता आहे. याबाबत वरि÷ अधिकाऱयांशी बोललो असून ते निर्णय घेतील असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

Related posts: