|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक

शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक 

 औरंगाबाद / प्रतिनिधी :

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार व महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.

औरंगाबादेत 11 व 12 मे रोजी घडलेल्या दंगलीनंतर पोलीसांनी धरपकड सुरू केली आहे. गांधीनगर भागातून रविवारी (दि. 20) रात्री पोलीसांनी दंगलीत सहभाग असल्याच्या संशयावरून चार जणांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले होते. या संशयितांना सोडवा, अशी मागणी माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी मध्यरात्री क्रांतीचौक पोलिसांत येऊन केली होती. याप्रकरणात पोलिसांनी संबंधितांना सोडण्यास नकार दिला. या वादावादीनंतर जैस्वाल व समर्थकांनी पोलीस ठाण्यात खुर्च्यांची फेकाफेक करत तोडफोड केली.

रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी निराला बाजार येथील त्यांच्या घरून ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्यांची घाटीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात रवाना करण्यात आले.

Related posts: