|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी खात्यात ठेवा 342 रुपये

पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी खात्यात ठेवा 342 रुपये 

नवी दिल्ली

 पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या बँक खात्यात किमान 342 रुपये ठेवणे आवश्यक आहे. सरकारकडून नागरिकांना पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना या दोन विमा योजना मिळतात. या विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या खात्यामध्ये 342 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. या दोन्ही विमा योजनांचा प्रिमियम मे महिन्यात वसूल करण्यात येतो. जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम 330 रुपये आणि सुरक्षा विमा योजनेचा प्रिमियम केवळ 12 रुपये आहे. मात्र या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या खात्यामध्ये किमान रक्कम गरजेचे आहे, मात्र ती नसल्यास लाभ घेता येणार नाही. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 4 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा विमा मिळतो. या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षांदरम्यान वय असणारा कोणताही व्यक्ती येऊ शकतो.