|Monday, August 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस लाईट लक्झरी’ स्मार्टफोन लाँच

सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस लाईट लक्झरी’ स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / पुणे :

सॅमसंगने ‘गॅलक्सी एस लाईट लक्झरी’ हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. एस लाइट हा एस 8चे छोटे व्हर्जन आहे. चीनमधील एका वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे.

गॅलक्सी एस लाइट हा चीनमधील JD.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 3,999 युआन म्हणजे जवळपास 40,000 रूपये आहे. डय़अुल सिम कार्ड असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओ ओएसवर आधारित आहे. यामध्ये 5.8 इंच सक्रिन असून यांचे रेझ्युलेशन 1080×2220 पिक्सल आहे. यामध्ये 2.2 GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रगन 660 प्रोसेसर देण्यात आले आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच वायफाय, जीपीएस, तसेच 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आली आहे.