|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विनोदी कोकणी ‘उ ला ला’ हा चित्रपट 27 रोजी प्रदर्शित

विनोदी कोकणी ‘उ ला ला’ हा चित्रपट 27 रोजी प्रदर्शित 

प्रतिनिधी/ पणजी

ऍक्सिस व्हिजन बॅनरच्या अतर्गत बनलेला, लोकांना पोट धरुन हसविणारा व मनोरंजनाने भरलेला ‘ उ ला ला’ हा कोंकणी विनोदी चित्रपट येत्या रविवारी दि. 27 मे रोजी मडगाव येथील रवींद्र भवनात संध्या 7.30 वा सिनेप्रेमींच्या उपस्थितीत प्रदर्शित होणार असल्याची माहीती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक श्रीपाद आर.ए पै यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत पै यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत राजीव हेदे, निलेश नेवलकर, आर्यन खेडेकर, राजेश पेडणेकर, जॉन डिसिल्वा, व प्रिंन्स जेकब उपस्थित होते.

मनोरंजन, विनोद व रहस्याने भरलेल्या या चित्रपटाचे निर्माते निलेश नेवलकर व मनिषा नेवलकर आहेत. तर सह-निर्मात लियोनार्ड बरेटो हे आहेत. तसेच गोवा राज्य चित्रपट महोत्सव 2018मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार प्राप्त झालेले राजेश पेडणेकर सोबत तियांत्रामध्ये काम करणारे गोव्याचे प्रसिध्द तियात्रिस्ट प्रिंस जेकब व जॉन डिसिल्वा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय तन्वी किशोर, राजीव हेदे, आर्यन खेडेकर, सी डिसिल्वा, स्पिरीट फर्नांडिस व चित्रा आल्फोंसो यांच्या देखील भूमिका आहेत. असे पै यांनी अधिक बोलताना सांगितले.

मडगाव येथे प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणार असल्याचे देखील पै यांनी यावेळी सांगितले.

Related posts: