|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देणार

मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देणार 

वार्ताहर/ कोगनोळी

गेल्या 5 वर्षात कोटय़वधी रुपयांची विकासकामे केली. मतदारांनी पुन्हा मला काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून केवळ विकासकामाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.

हंचिनाळ-केएस येथे सोमवारी रात्री आभार दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ब्रम्हनाथ मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भरमू पाटील होते. व्यासपीठावर सीताराम कोंडेकर, बाळगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

सागर चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आमदार जोल्ले यांचा आक्काताई हवालदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी परीक्षेत 93 टक्के गुण संपादन करून यश मिळविल्याबद्दल नंदिनी सुतार हिचा आमदार जोल्ले यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी ग्रा. पं. सदस्य एम. वाय. हवालदार म्हणाले, गेल्या पाच वर्षात आमदार जोल्ले यांनी लोकोपयोगी कामे केली. विरोधकांनी प्रचारसभेत घाणेरडे आरोप केले. मात्र त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. बडे नेते एकत्र येऊनही मोठा पराभव झाला. मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे सांगितले.

आर. एल. चौगुले म्हणाले यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य बबन हवालदार, भिमराव चौगुले, रावसाहेब नलवडे, एम. के. चौगुले, विजय पंचम, बाबासो पोवार, दीपक मगदूम, बाळासो वाघवडे, अजित सुतार, बसगोंडा पाटील, मधुकर चौगुले, शिवगोंडा पाटील, गणेश कोंडेकर, श्रीधर पाटील, बाबू चौगुले, सिकंदर ढाले, कांतीलाल कांबळे, विजय गवळी, संतोष चौगुले, अंकुश चौगुले, अशोक नलवडे, संजय कोंडेकर, विकास नलवडे, आक्काताई हवालदार, शिला पाटील, महादेवी संकपाळ, राजश्री वंदुरे, लक्ष्मी लोहार, महादेवी पाटील, संगीता चौगुले, छाया गवळी उपस्थित होते.

Related posts: