|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पावसाळी मासेमारी बंदी 1 जूनपासून

पावसाळी मासेमारी बंदी 1 जूनपासून 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

1 जून ते 31 जुलै या कालावधीत राज्याच्या सागर किनाऱयांवर यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, मालवण यांनी दिली. पावसाळय़ात म्हणजेच जून व जुलै महिन्यांमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे या काळात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठय़ाचे जतन होते. या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे शक्मय होते. या हेतूने यावषी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत राज्यात सागरी क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत ही बंदी सागर किनाऱयापासून 12 सागरी मैल इतक्मया अंतरापर्यंत लागू असणार असल्याची माहिती देण्यात आली.