मागील 7 महिन्यांत 39 लाख नव रोजगांराची निर्मिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तरुणाई नोकरी शोधण्याच्या मागे धावत असते त्यावेळी रोजगार कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात उपलब्ध आहेत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ईपीएफओ कडून देण्यात आलेल्या माहिती मागील सात महिन्यांच्या कालावधीत देशात 39.36 लाख नविन रोजगार निर्माण करण्यात आल्याची माहिती ईपीएफओ कडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालातून सांगण्यात आले आहे.
39.36 लाख रोजगार निर्माण करण्यात आल्याची एकूण आकडेवारी मार्च 2018 या कालावधी पर्यंतची घेण्यात आली आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या कडील आकडेवारीत मार्च 2018 रोजी 6.13 लाख इतकय़ा प्रमाणात नव रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. कर्मचारी नोंदणी एम्पलॉयमेन्ट प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन याच्यांकडे नोंदणी करण्यात आलेल्या फेंब्रुवारी 2018 मधील 5.89 लाख आकडेवारी उपलब्ध असणाऱया यादीतून स्पष्ट दिसून येते.
इलेक्ट्रकल, मॅकेनिकल, इंजीनिअरिंग बांधकाम क्षेत्र, औद्योगीक क्षेत्र, व्यापार विषयक आदी क्षेत्रांमध्ये नवरोजगार निर्माण झाले आहेत. सादर करण्यात आलेल्या माहितीमधून संघटन क्षेत्रामध्ये देशामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये एकूण रोजगार निर्मिती पैकी अर्ध्याच्यावर रोजगारांची निर्मिती झाल्याची नोदणी करण्यात आली आहे.