|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सूर्यानजीक पोहोचणार 11 लाख जणांची नावे

सूर्यानजीक पोहोचणार 11 लाख जणांची नावे 

पार्कर सोलर प्रोबचे जुलै महिन्यात प्रक्षेपण

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

सूर्यानजीक पोहोचणारी पहिली अंतराळ मोहीम पार्कर सोलर प्रोब जुलै महिन्यात सुमारे 11 लाख जणांची नावे आपल्यासोबत नेणार आहे. 7 वर्षांच्या या नासाच्या मोहिमेदरम्यान हे यान सूर्याच्या वातावरणात 24 वेळा प्रवेश करणार आहे. अद्याप कोणतेही अंतराळ यान सूर्यानजीक पोहोचलेले नाही.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबमध्ये पार्कर सोलर प्रोबची निर्मिती करण्यात आली आहे. पार्क सोलर प्रोब सूर्याबद्दल आमच्या माहितीत मोठी भर घालणार आहे. जवळून अध्ययन होणारा हा एकमात्र तारा असेल, असे प्रकल्प तज्ञ निकोला फॉक्स यांनी सांगितले.

कोणतीही मानवनिर्मित वस्तू पहिल्यांदाच अशा स्थितीला तोंड देईल. हे अंतराळयान या मोहिमेबद्दल उत्सुक असणाऱया अनेक व्यक्तींची नावे आपल्यासोबत नेणार असल्याचे फॉक्स म्हणाल्या. मार्च महिन्यात कोणत्याही ताऱयापर्यंत पोहोचणाऱया पहिल्या अंतराळयानासोबत स्वतःचे नाव पाठविण्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. सात आठवडय़ांहून अधिक काळ चाललेल्या या प्रक्रियेत एकूण 1137202 नावे नोंद झाली. ही नावे एका मेमरी कार्डमध्ये साठविण्यात आली असून 18 मे रोजी ते अंतराळयानात जोडण्यात आले. हे अंतराळयान 31 जुलै रोजी उड्डाण भरणार आहे. यूगीन पार्कर यांचे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. यूगीन यांनीच सौरवादळांच्या अस्तित्वाबद्दल सर्वप्रथम अनुमान व्यक्त केला होता.

Related posts: