|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जागतिक शक्तीच्या स्वरुपातील भारताच्या उदयाला समर्थन

जागतिक शक्तीच्या स्वरुपातील भारताच्या उदयाला समर्थन 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 प्रमुख जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात एक मुख्य सहकाऱयाच्या स्वरुपात अमेरिका समर्थन करत असल्याचे विधान ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने केले. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सध्या अत्यंत दृढ झाल्याचा दावा अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी केला. व्यापार वाद तसेच रशिया आणि इराणच्या विरोधात अमेरिकेच्या निर्बंधांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ‘द काउंटरिंग अमेरिकाज ऍडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स ऍक्ट (सीएएटीएसए)वर स्वाक्षरी केली आहे. यांतर्गत रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. सीएएटीएसएच्या कलम 231 अंतर्गत  रशियासोबत संरक्षण आणि गुप्तचर क्षेत्रात महत्त्वाची देवाणघेवाण करणाऱयांच्या विरोधात निर्बंध लादण्याची तरतूद आहे. अमेरिका-भारत भागीदारी लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित असून नियम व्यवस्थेसाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे समर्थन करत असल्याचे नॉर्ट म्हणाल्या. विदेशमंत्री माइक पॉम्पियो आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यंदा वॉशिंग्टमध्ये पहिल्या ‘भारत-अमेरिका 2+2 चर्चेचे’ आयोजनाची तयारी करत आहेत. या बैठकीची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.