|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयएनएसव्ही ‘तारिणी’च्या चमूने घेतली पंतप्रधानांची भेट

आयएनएसव्ही ‘तारिणी’च्या चमूने घेतली पंतप्रधानांची भेट 

प्रतिनिधी/ पणजी

आयएनएसव्ही तारिणी या नौकेवरून यशस्वीपणे विश्व प्रदक्षिणा करणाऱया भारतीय नौदलातील महिला अधिकाऱयांनी काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव असलेल्या या मोहिमेत केवळ महिलांचा सामावेश असलेल्या नौकेने पहिल्यांदाच विश्व प्रदक्षिण पूर्ण केली. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान या अधिकाऱयांनी आपल्या मोहिमेशी संबंधित विविध पैलू, मोहिमेची तयारी, प्रशिक्षण आणि मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली

या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी या महिला अधिकाऱयांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या प्रवासाचे अनोखेपण शब्दबद्ध करून इतरांपर्यंत पोहोचवावेत, असे आवर्जुन सांगितले. नौदल प्रमुख ऍडमिरल सुनिल लांबाही उपस्थित होते. लेफ्टनन्ट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनन्ट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, तसेच लेफ्टनंट एस, विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या अधिकाऱयांचा या मोहिमेत सहभाग होता.

Related posts: