|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चोडण रायबंदर फेरीसेवा रोखत चोडन युनायटेडचे आंदोलन

चोडण रायबंदर फेरीसेवा रोखत चोडन युनायटेडचे आंदोलन 

वार्ताहर/ पणजी

चोडण रायबंदर जलमार्गावरील फेरीबोट सेवा विस्कळीत झाल्याने चोडण युनायटेड संघटनेतर्फे बुधवारी या मार्गावरील फेरीबोट सुमारे 2 तास रोखून धरत आंदोलन केले. या मार्गावरील फेरीबोटींची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम फेरीसेवेवर होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांचे यामुळे हाल होत असून त्याच्या निषेधार्थ चोडण युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहेत.

या जलमार्गावर एकूण 5 जुन्या फेरीबोटी जा ये करत होत्या. त्यातील एक फेरीबगोट इतर मार्गावर हलविल्यामुळे येथील फेरीसेवेवर याचा परिणाम झाला आहे. बऱयाचवेळा काही फेरीबोट नादुरूस्तही होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास फेरीबोटीची वाट पाहत बसावे लागत आहे. चोडण फेरीबोटीच्या मार्गाने चोडण, मये, डिचोली येथील हजारो प्रवासी प्रवास करत असतात. नदी परिवहन खात्याने जाणून बुजून या फेरीसेवेकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे ही सेवा विस्कळीत बनली आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठीच चोडण युनायटेड संघटनेने बुधवारी सुमारे दोन तास चोडण भागातील फेरीबोट रोखून धरली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांची धांदलही उडाली.

महिन्याभरापूर्वीच नदी परिवहन खात्याकडून चोडण रायबंदर फेरीसेवेसाठी तीन नवीन फेरीबोटी उपलब्ध करून दिल्या होत्या. या फेरीबोटींचे उद्घाटनही करण्यात आले होते, परंतु या फेरीबोटींमध्ये टॉयलेटची सोय नसल्याने फेरीबोटीवरील कर्मचारी लांब पल्ल्यासाठी या फेरीबोटी चालविण्यास उत्सुक नाहीत, सध्या या फेरीबोटी बेती येथील नदिपरिवन खात्याच्या डॉकवर पडून आहेत. चोडण ते रायबंदर धक्का परिसारत टॉयलेटची सोय नसल्याने कर्मचाऱयांची कुंचबना होते. एक तर या धक्यांवर टॉयलेटची सोय करा, किंवा फेरीबोटीत तरी टॉयलेटची सोय करा, अशी मागणी कर्मचाऱयांकडून होत आहे.

Related posts: