|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इटलीत ट्रकला रेल्वेची धडक, 2 जण ठार

इटलीत ट्रकला रेल्वेची धडक, 2 जण ठार 

रोम / वृत्तसंस्था :
इटलीमध्ये गुरुवारी सकाळी एक रेल्वे दुर्घटना झाली आहे. रूळावर अडकून पडलेल्या ट्रकला रेल्वेने धडक दिल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेत रेल्वेचे 3 डबे रूळावरून घसरले असून यात 2 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांमध्ये रेल्वे अभियंत्याचा समावेश असून रुग्णालयात उपचार घेताना एका प्रवाशाने अखेरचा श्वास घेतला आहे. इटलीच्या तूरिन येथू इवेरा शहराच्या दिशेने रेल्वे प्रवास करत होती.
या दुर्घटनेतून ट्रकचालक बचावला आहे. रेल्वेच्या आगमनाअगोदर फाटक पडल्यानंतर देखील ट्रकचालकाने ते तोडून रेल्वेमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ट्रक रेल्वेमार्गावर अडकवू पडल्याने चालकाने तेथून पळ काढला होता.

Related posts: