|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरनाईककडून दोन गावठी पिस्तुले जप्त

सरनाईककडून दोन गावठी पिस्तुले जप्त 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

जरगनगर येथील प्रतिक पोवार खून प्रकरणातील संशयित आरोपी प्रतिक सरनाईक याच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल सहा जिवंत काडतुसे जप्त केली. पाचगाव येथील ओढयाच्या पुलाखाली ती पुरून ठेवली होती. वाराणसीतून एक लाख रूपयांना चार पिस्तुल सरनाईकने विकत घेतली होती, अशी माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी गुरुवारी दिली.

जाधव म्हणाले, शांतादुर्गा कॉलनी प्रतिक ऊर्फ चिंटू पोवारचा जरगनगर येथील अण्णा ग्रुप चौकात संशयित प्रतिक सरनाईकने गोळय़ा घालून खून केला होता. रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी संशयिताला पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयिताला बुधवारी घटनास्थळी फिरवण्यात आले होते.

दोन फुट खड्डात पुरली होती पिस्तुले

संशयित सरनाईककडे आणखी दोन गावठी पिस्तुलें असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयिताकडे चौकशी केली असता त्याने याची कबुली दिली. संशयित सरनाईकला घेऊन पोलीस पाचगाव ते कंदलगाव मार्गावर असलेल्या ओढय़ाच्या पुलावर आले. तेथे या पुलाखाली दोन फुट खड्डा खणून त्यात प्लॉस्टीकच्या पिशवीत लपवलेले दोन गावठी पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत.

वाराणसीमधून एक लाखांना घेतली चार गावठी पिस्तुले

शांतादुर्गा कॉलनीत अण्णा ग्रुप होता. त्यात हे सर्वजण एकत्र होते. पण मंडळाच्या काही तरूणांनी प्रतिक सरनाईकला मारहाण केली. त्यानंतर तो ग्रुपमधून बाजूला झाला होता. तो पुण्यात गेला. तेथे चालक म्हणून तो काम करत होता, पण मारहाणीचा बदला घ्यायचा, याचा विचार कायम होता. त्यातूनच त्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाऊन 1 लाख रूपयांना चार गावठी पिस्तुल खरेदी केली होती. त्यातील एक पिस्तुल इचलकरंजीत हवेत गोळीबार केला म्हणून पोलिसांनी जप्त केले आहे. प्रतिक पोवारच्या खुनात दुसरे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. उर्वरित दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे संशयित आरोपी सरनाईक याने पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.

Related posts: