|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वे अपघातात सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू

रेल्वे अपघातात सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू 

वार्ताहर /लांजा

निरव्हाळ-चिपळूण येथील एका सिव्हिल इजिनियरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. 25 मे रोजी रात्री विलवडे रेल्वे स्थानकाजवळील वाघणगाव बोगद्यानजीक हा अपघात झाला. दरम्यान कोणत्या रेल्वेतून हा अपघात झाला हे निश्चित झालेले नाही.

मंगेश सिताराम चव्हाण (42) हे वर्षीय सिव्हिल इंजिनियर 25 मे रोजी गोव्यात आपल्या मित्राकडे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून रात्री गोव्याहून रेल्वेने मुंबईकडे निघाले होते. लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्थानकानजिक वाघणगाव बोगद्या जवळ लाईनमन आनंद जाधव याना ते रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता व शरीरावरही गंभीर जखमा होत्या. यात यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानी या अपघाताची माहिती विलवडे स्थानकात व तेथून लांजा पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हा अपघात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र नेमक्या कोणत्या ट्रेनने मंगेश चव्हाण प्रवास करत होते व हा अपघात कसा झाला हे स्पष्ट झाले नव्हते.

चिपळुणात रेल्वेच्या धडकेने दोघेजण ठार

खेर्डी रेल्वे पुलानजीक घडल्या वेगवेगळय़ा घटना

प्रतिनिधी /चिपळूण

कोकण रेल्वे मार्गावरील खेर्डी पुलानजीक शनिवारी रेल्वची धडक बसून दोघेजण वेगवेगळय़ाठिकाणी ठार झाल्याची घटना घडली. यापैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.

येथील वालोप रेल्वे स्थानकापासून नजीकच्या अंतरावर असलेल्या खेर्डी पुलावर रेल्वे रूळानजीक पहाटे 3.40 वाजता हा मृतदेह आढळून आला. पुरूष जातीच्या या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी विजय बालाजी जाधव यांनी पोलिसात खबर दिली आहे. त्याप्रमाणे येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या घटनेपाठोपाठ लालू रामपलक यादव (24, खेर्डी चिलेवाडी) या तरूणाचा मृतदेह खेर्डी-खतातेवाडी येथे सकाळी 11.30 वाजता आढळून आला. लालू हा येथे भंगारचा व्यवसाय करत होता. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक गिरीधारीलाल झवेरिया यांनी खबर दिली आहे.

Related posts: