|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या 

प्रतिनिधी / बेळगाव

हाडगिनहाळ (ता. गोकाक) येथील एका कर्जबाजारी शेतकऱयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकीकडे शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यासाठी काँग्रेस-निजद युतीचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजपने दबाव वाढवलेला असतानाच शेतकऱयांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.

शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. बसाप्पा यल्लाप्पा वंटगुडी (वय 48) असे त्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. बसाप्पाने गोकाक तालुक्मयातील काही सोसायटय़ांमधून कर्जाची उचल केली होती. कर्जाची परतफेड करणे शक्मय झाले नाही. याच मनस्तापातून विष पिऊन त्याने आत्महत्या केली आहे.

गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केवळ 24 तासांत शेतकऱयांची कर्ज माफ करण्याची घोषणा निवडणुक प्रचारादरम्यान कुमारस्वामी यांनी केली होती. दिलेल्या वचनाला जागून शेतकऱयांनी सोसायटय़ा व राष्ट्रीयकृत बँकांतून काढलेली कर्जे माफ करावी, या मागणीसाठी भाजपने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविला आहे. सोमवारी कर्नाटक बंदची हाक दिली असतानाच घडलेल्या आत्महत्येच्या प्रकाराने शेतकऱयांतून खळबळ माजली आहे.