|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » एव्हरेस्टवर 15 भारतीय अडकले, सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरद्वारे केली मदतीची मागणी

एव्हरेस्टवर 15 भारतीय अडकले, सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरद्वारे केली मदतीची मागणी 

ऑनलाईन टीम / काठमांडू :

 एव्हरेस्ट शिखरावर अडकलेल्या या 15 जणांनी ट्विट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतची मागणी केली आहे. स्वराज यांनीही या घटनेची दखल घेतली असून, त्यांनी तातडीने नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकारी मनजीव सिंह पुरी यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले आहे.

मागील 3 दिवसांपासून हे भारतीय एव्हरेस्टवर अडकले आहेत. खराब हवामानामुळे येथील सर्व विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर येण्याचा मार्ग उरला नसल्याची माहिती समोर आली आहे.  अमित थढानी नावाच्या एका गिर्यारोहकाने शनिवारी (26 मे) सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करून मदतची मागणी केली. ‘आम्ही लुकलामध्ये अडकलो आहोत. आम्ही एकूण 15 भारतीय आहोत. स्थानिक दूतावासाशी संपर्क साधला. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. आमची मदत करू शकता का?,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटची गांभीर्याने दखल घेत सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱयांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची सूचना केली. दरम्यान, सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली.

Related posts: