|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » रशियाची पॅव्हेलचेंकोव्हा अजिंक्य

रशियाची पॅव्हेलचेंकोव्हा अजिंक्य 

वृत्तसंस्था/ स्ट्रासबर्ग

रशियाच्या ऍनास्टेसिया पॅव्हेलचेंकोव्हाने स्ट्रासबर्ग आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. 31 वर्षीय पॅव्हेलचेंकोव्हाने अंतिम सामन्यात सिबुलकोव्हाचा 6-7 (5-7), 7-6 (7-3), 7-6 (8-6) असा पराभव करत सोमवारपासून सुरू होणाऱया फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

जागतिक महिला टेनिसपटूंच्या मानांकनात 31 व्या स्थानावर असलेल्या पॅव्हेलचेंकोव्हाने डब्ल्युटीए टूरवरील 12 स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने हा अंतिम सामना साडे तीन तासांच्या कालावधीत जिंकला. सिबुलकोव्हाने यापूर्वी सात सामन्यात रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाला पराभूत केले होते. पेव्हेलचेंकोव्हाने या अंतिम सामन्यात 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली आहे. पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पॅव्हेलचेंकोव्हाचा पहिल्या फेरीतील सामना स्लोव्हेनियाच्या हेरकॉगशी तर स्लोव्हाकियाची बिगर मानांकित सिबुलकोव्हाचा सलामीचा सामना ज्युलीया जॉजेसशी होणार आहे.

Related posts: