|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महापौर शोभा बोन्द्रs यांच्या निवडीबद्दल तारळे येथे साखर-पेढे वाटून आनंदोत्सव

महापौर शोभा बोन्द्रs यांच्या निवडीबद्दल तारळे येथे साखर-पेढे वाटून आनंदोत्सव 

प्रतिनिधी/ कसबा तारळे

येथील सुकन्या व कोल्हापुरातील बोन्द्रs घराण्याची सून असलेल्या सौ. शोभा बोन्द्रs यांची कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी स्थानिक सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

येथील शेतकरी विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव गणपती पाटील यांची जेष्ठ कन्या व भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांची भगिनी सौ.शोभा बोन्द्रs यांची महापौरपदी नुकतीच निवड झाली. यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रविवारी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्रित जमले. स्वागत ग्रा.प.चे सदस्य अरुण पाटील यांनी केले. प्रास्ताविकात भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांनी माझी जेष्ठ भगिनी शोभाताई बोन्द्रs यांना मिळालेल्या महापौर पदामुळे या गावची उंची वाढली असून बोन्द्रs घराण्याची राजकीय परंपरा पुढे नेतील असा आशावाद व्यक्त केला. यावेळी भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, शिवाजी अनंत पाटील, बादशहा नायकवडी, उदय पाटील, याकूब बक्षू आदींनी मनोगतात अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास कृष्णात पाटील, हृदयनाथ पाटील, अमर वणकुद्रे, लक्ष्मण पाटील, महादेव पाटील, लक्ष्मण शिवूडकर, संग्राम पाटील, सुनील सायेकर, विष्णू कांबळे, अरुण आंबेकर, नागेश वागरे, संदीप पाटील, राजू जाधव यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.

 

Related posts: