|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : 9 वाजेपर्यंत पाच टक्के मतदान

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : 9 वाजेपर्यंत पाच टक्के मतदान 

ऑनलाईन टीम / भंडारा-गोंदिया :

भंडारा – गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सुरूवात झाली असून पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी 31 मे रोजी जाहीर होणार आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होìर व्हेरिफाईड पेपर टेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्मयात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच असेल.

एकूण दोन हजार 126 मतदान केंद्र असून 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

 

 

 

 

Related posts: