|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओडिशातील बीजेडीचे खासदार पांडा यांचा राजकारणाला रामराम

ओडिशातील बीजेडीचे खासदार पांडा यांचा राजकारणाला रामराम 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

 बिजू जनता दलाच्या (बीजेडी) प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित झालेले खासदार बैजंयत जय पांडा यांनी राजकारण सोडण्याचे आणि लोकसभा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा सोमवारी केली. त्यांनी बीजेडीचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाच्या घसरत्या दर्जाचा उल्लेख केला.

ओडिशाच्या केंद्रापाडा येथील खासदार पांडा यांनी पटनायक यांना पत्र लिहिले आहे. राजकारण सोडण्याचा निर्णय मी विचारांती घेतला आहे. आमच्या बीजेडीचा दर्जा खूपच खालावला असून याबद्दल अतीव दुःख वाटत असल्याचे त्यांनी पत्राद्वारे म्हटले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच पक्ष मूळ तत्वांपासून भटकत असल्याचे मी सांगत आलोय. माझ्याविरोधात कट रचण्यात आला, तरीही तुमच्याव्यतिरिक्त याबद्दल बाहेर कधीच बोललो नाही. अनेकदा माझ्यावर दगड देखील फेकण्यात आले. तुम्ही याबद्दल विचार करणे देखील आवश्यक न मानल्याने दुःख झाल्याचे पांडा म्हणाले.

अभ्यासू खासदार

बैजयंत संसदेत झालेल्या कामकाजानुसारच वेतन स्वीकारत आले आहेत. पांडा यांनी मागील हिवाळी अधिवेशन गोंधळात वाया घेतल्याने वेतन नाकारले होते. पांडा यांचा समावेश लोकसभेच्या अभ्यासू खासदारांमध्ये केला जातो.