|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पंतप्रधान मोदींशी कुमारस्वामींची भेट

पंतप्रधान मोदींशी कुमारस्वामींची भेट 

सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण, राहुल गांधी मातेसह विदेश दौऱयावर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान मोदीची कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट होती असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मात्र, कर्नाटकात त्यांना पाठिंबा देणाऱया काँगेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी ते विदेशी गेले आहेत.

जेव्हा कोणत्याही राज्यात नव्या मुख्यमंत्र्याची निवड होते, तेव्हा तो पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतो, अशी पद्धती आहे. तिचे मी पालन केले आहे. पंतप्रधान मोदींशी माझी औपचारिक चर्चा झाली. त्यात राजकीय विषय नव्हते, असे वक्तव्य त्यांनी केले. मोदींना कुमारस्वामींनी कर्नाटकी पगडी भेट दिली, तसेच हारही घातला.

मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबितच

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी निजद आणि काँगेस यांच्यातील चर्चा अनिर्णित अवस्थेत आहे. काही काँगेस नेते दिल्लीत चर्चेसाठी आले आहेत. त्यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्याशी बोलणी केली. तथापि, राहुल गांधी सोनिया यांच्याबरोबर विदेशी गेल्याची ती अर्धवट राहिली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा प्रश्न लटकला आहे.

कुमारस्वामी नाराज ?

मंत्रिमंडळ प्रश्न अद्याप अधांतरी असल्याने कुमारस्वामी नाराज आहेत, असे समजते. आपण काँगेसच्या ‘दये’वर आहोत, कर्नाटकातील साडेसहा कोटी जनतेच्या दयेवर नाही. आपल्याला जनतेने पूर्ण जनादेश दिला नाही. त्यामुळे काँगेसच्या सहमतीशिवाय आपण काही करू शकत नाही, असे उद्वेगजन्य उद्गार त्यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविवारी काढले होते.

Related posts: