|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संत गोरोबा कुंभार वसाहतीमध्ये कुंभार भवन उभारणार

संत गोरोबा कुंभार वसाहतीमध्ये कुंभार भवन उभारणार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  पुंभार समाजाची पारंपरिक कला जोपासण्यासाठी बापट कॅम्प येथील संत गोरोबा कुंभार वसाहतीमध्ये कुंभार भवन उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. येथील शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.

  पालकमंत्री पाटील म्हणाले, कुंभार बांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी यामधील जाचक अटी शिथिल करण्यात येणार आहे. तसेच व्यवसाय करण्यासाठी असणारी एन.ए. ची अट रद्द करण्याचे व माती ओढण्याची अट शिथिल करण्याचे आश्वासन दिले. तसेच समाजाची पारंपरिक कला जोपासण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सोहळय़ास अखिल महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, मनपाचे स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, संजय निगवेकर, अरुण निगवेकर, प्रकाश कुंभार, शांताराम माजगांवकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव कमलाकर आरेकर यांनी केले. सर्जेराव निगवेकर यांनी आभार मानले.

 

 

 

Related posts: