|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मंदिर समिती अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

मंदिर समिती अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा 

पंढरपूर / संकेत कुलकर्णी 

येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षांना आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्यमंत्रीपदांचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या राजकीय ‘ वजनास ’ अधिक पुष्टी मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱया विठ्ठलांच्या मंदिर समितीच्या अध्यक्षपदी सध्या कराडचे भाजपाचे अतुल भोसले विराजमान आहेत. त्यांच्या कार्यकाळामधे मोठय़ा प्रमाणावर विकासकामांची नांदी पंढरपूरात अवतरली गेली. मात्र, यामधील बहुतांश कामे ही प्रगतीपथावर तर काही केवळ प्रारंभीच्याच उंबरठयावर येउन थंबकली गेलेली आहेत. अशामध्येच भोसलेंना अर्थात स†िमतीच्या अध्यक्षाना राज्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यासंबंधी नोटीफ्ढिकेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस यांनी केलेली स्वाक्षरी ही स्वागतार्ह आहे.

मंदिर समितीचे अध्यक्षपद हे साधारणपणे 1985 सालापासून आहे. अनेक शासनाच्या महामंडळाबरोबरच मंदिर समितीच्या अध्यक्षपदी देखिल राजकीय पुनर्वसन करण्यासाठी एखाद्या राजकारणी मंडळीची निवड होती. यातूनच या समितीवर भोसलेंची निवड झाली. मात्र, 1985 सालापासून आजपर्यंत या पदास कुधीच कुठल्याही प्रकारची राज्यमंत्री किंवा तत्सम पदांचा दर्जा नव्हता. मात्र, केवळ शासन स्थापित मंदिर समिती असल्यांने येथील अध्यक्षपदास राजदरबारी सन्मान होता. मात्र आता राज्यमंत्री दर्जा आल्याने सदरचा समितीच्या अध्यक्षपदांचा सन्मान अधोरेखित होताना दिसणार आहे.

वास्तविक पाहिले तर समितीचे अध्यक्ष अतुल भोसलें यांच्या प्रयत्नातून पॅनडा सरकारकडून दोन हजार कोटी रूपयांचा निधी पंढरपूरात येण्याच्या हालचाली झाल्या. मात्र, त्यानंतर कुठे माशीं शिकली गेली कळले नाही. मात्र, आता राज्यमंत्रीपदांचा दर्जा आल्याने पंढरपूरचा विकास हा पॅनडा सरकार असो किंवा अधिकच्या अधिकाराने स्थानिक प्रशासकीय पातळीवर भाविकांना देखिल भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न होताना दिसणार आहेत.

याचबरोबरीने पाहिले तर मंदिर समितीच्या अध्यक्षपदांवर अतुल भोसलेंचा आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला गेला आहे. त्यामुळे यांचे पडसाद हे सातारा जिल्हय़ातील देखील राजकारणावर पडताना दिसणार आहेत. कारण अतुल भोसलें यांची 2014 साली प्रथ्वीराज चव्हाण यांच्याशी लढत झालेली होती. त्यामुहे भोसलेंना फ्ढडणवीसांनी अधिकची ताकद देउन मोठय़ा प्रमाणावर कराडच्या माध्यमातून सातारामधे भाजपाचे पाय पसरण्यास देखील सुरूवात केलेली आहे.

Related posts: