|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » नविन खरेदीसह बाजारात तेजी

नविन खरेदीसह बाजारात तेजी 

प्रतिनिधी /मुंबई :

गुरुवारी बाजारात नविन खरेदी झाल्याने बाजारात जोरदार तेजीचे वातावरण पहावयास मिळाले. दिवभरातमध्ये शेवटच्या काही तासात शॉर्ट रिकव्हरी झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स मध्ये 500 अंकाहून जादा मजबुती बघायला मिळाली. तर निफ्टी 10,750 च्या पुढे जाऊन पोहचली होती. शेवटच्या क्षणात सेन्सेक्स 35,300 च्या वरती बंद झाला. त्यावेळी निफ्टीत 120 अंकाची मजबुती होती.

गुरुवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव पहावयास मिळाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यानी घसरण होत 16.014 वर जाऊन बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांकसह 0.4 टक्के कमजोर होत 18,903.3 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅपचा निर्देशांकत 0.5 टक्कय़ांनी घसरत होत 17,250 वर बंद झाला.

बीएसईच्या 30 मुख्य शअर्सचा निर्देशांकातील सेन्सेक्स 416 अंकानी म्हणजे 1.2 टक्केची उसळी घेत 35,322 वर बंद झाला. तर एनएसईच्या 50 मुख्य शेअर्सचा निर्देशांक व निफ्टीत 122 अंकानी जवळपास 1 टक्के जास्त तेजी सोबत 10,736 वर बंद झाला.

बाजारात खासगी बँका, फायनान्स सेवा, आयटी, एफएमसीजी आणि ऑईल ऍण्ड गॅस याच्या शेअर्सची चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले. बँक निफ्टीत 2.4 टक्केची वाढ होत 26,956 वर बंद झाला. तर ऑटो, औषध निर्माण, धातू निर्मीती, रियल्टी, कॅपीटल गुड्स, कज्युबर डय़ीरेबल आणि वीज यांच्या शेअर्स मध्ये काही प्रमाणात दबाव दिसून आला.

दिवसभरातील व्यवहारात अदानी पोर्ट्स,एचडीएफसी बँक,इन्डसइंड बँक, टेक महिंद्रा, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एचयुएल याच्या व्यवहारात 4.7-2.75 टक्केवर उसळी घेत व्यवहार बंद झाला. तर सन फार्मा , टाटा मोटर्स,हिंडाल्को,हीरो मोटो,टायटन,डॉ. रेड्डीज लॅब आणि मारुती सुझुकी या कंपन्याच्या व्यवहारात 3-0.8 टक्कय़ांची घसरण होत बाजार बंद झाला.

 

 

Related posts: