|Sunday, February 23, 2020
You are here: Home » क्रिडा » आनंदची वेस्लेविरुद्ध बरोबरी

आनंदची वेस्लेविरुद्ध बरोबरी 

वृत्तसंस्था/ स्टॅव्हन्गेर

भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने ऍल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सलग चौथी बरोबरी नोंदवली. येथे त्याने अमेरिकेच्या वेस्ले सोविरुद्ध बरोबरी संपादन करत शक्य असलेल्या 4 पैकी 2 गुण संपादन केले. विश्वनाथन आनंदने वेस्ले सोविरुद्ध इंग्लिश ओपनिंगवर भर दिला होता. त्याला आता उर्वरित 5 सामन्यात यश खेचून आणण्यावर अधिक भर द्यावा लागेल. विद्यमान विश्वजेता मॅग्नेस कार्लसन व अमेरिकेचा हिकारु नाकामुरा यांच्यातील लढत बरोबरीत सुटणे मात्र आश्चर्याचे ठरले. या बरोबरीसह मॅग्नेस कार्लसनचे अव्वलस्थान कायम राहिले. सध्या त्याच्या खात्यावर शक्य असलेल्या 4 पैकी 3 गुण आहेत.

रशियाचा सर्जेई कर्जाकिन अडीच गुणांसह दुसऱया स्थानी आहे. त्याने चौथ्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्झिमे व्हॅशायर-लॅग्राव्हेविरुद्ध सहज विजय संपादन केला. येथे त्याने आपल्या सखोल तयारीचा उत्तम दाखला देत प्रेंचमन प्रतिस्पर्धीला चीत केले. भारताचा विश्वनाथन आनंद हा अर्मेनियाचा लेव्हॉन ऍरोनियन, वेस्ले व नाकामुरा यांच्यासह संयुक्त तिसऱया स्थानी विराजमान आहे.

दिवसभरातील अन्य लढतीत, ऍरोनियनने अझरबैजानच्या शखरियार मेमेद्यारोव्हविरुद्ध बरोबरी प्राप्त केली तर चीनच्या डिंग लिरेनला अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्ध शस्त्रक्रियेमुळे खेळता येणार नव्हते.

Related posts: