|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » मारुती सुझुकी घटविणार उत्सर्जन

मारुती सुझुकी घटविणार उत्सर्जन 

नवी दिल्ली

 : वाहनांतून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन घटविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे, असे मारुती सुझुकी इंडियाकडून सांगण्यात आले. युरोपियन महासंघामध्ये वाहनांसाठी कठोर नियमावली लागू करण्यात येते, त्याप्रमाणे भारतातही त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. याप्रमाणे गुरुग्राम प्रकल्पामध्ये 5 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मानेसरमधील सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येईल. हार्टटेक्ट या उपक्रमांतर्गत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन 6 ते 8 टक्क्यांदरम्यान ठेवण्यात येत आहे, असे कंपनीचे सीईओ केनिची आयुकावा यांनी सांगितले. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर बलेनो, इग्निस, स्विफ्ट आणि डिझायरमध्ये करण्यात येतो.

 

Related posts: