|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोटेश्वर पुलाचे बांधकाम पावसाळय़ानंतर सुरु करा

कोटेश्वर पुलाचे बांधकाम पावसाळय़ानंतर सुरु करा 

प्रतिनिधी/ सातारा

शाहूपुरी ते शुक्रवार पेठ या दरम्यान सुरु असलेल्या पुलाचे काम करताना नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱया पाईपलाईन तुटल्याने ते काम सध्या बंद आहे. त्यातच आता पावसाळा सुरु होत असून या ओढय़ाला पूरही येतो. त्यामुळे पुलाचे काम पावसाळा संपल्यानंतर करावे, सध्या पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी केली आहे.

संजय पाटील यांनी याबाबतचे निवेदन सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोटेश्वर पुलाचे काम सुरु करण्यात आल्यानंतर सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, काम सुरु असताना नगरपालिकेकडून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने सध्या हे काम बंद अवस्थेत आहे. त्यातच आता पावसाळा सुरु होत असून पावसाळय़ात या ओढय़ाला पूरही येत असतो. त्यामुळे कोटेश्वर पुलाचे काम आता पावसाळय़ानंतर सुरु करावे. तसेच हा पूल त्या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करावा. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. पुलावरील वाहतूक बंद असल्याने सध्या नागरिकांना पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सरपंच अमृता प्रभाळे, रमेश धुमाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नन