|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » अमित शाह यांची ‘मातोश्री’भेट संभ्रमात

अमित शाह यांची ‘मातोश्री’भेट संभ्रमात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षीत भेटीबद्दल अचानक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंचे निवास्थान असलेल्या मातोश्रीवर हे दोन्ही नेते भेटणार होते.

भाजपकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौऱयाच्या वेळापत्रकात ‘मातोश्री’ भेटीची वेळ ठरली होती. त्यानुसार संध्याकाळी 7.30 वा. अमित शाह हे मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेणार होते. मात्र नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात, मातोश्री भेटीचा उल्लेख नाही. त्यामुळे शिवसेनेच्या टीकेनंतर भाजपने अमित शाहांचा प्लॅन बदलला तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.