|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » नगरमध्ये वाळू माफीयांची तहसीलदाराच्या वाहनचालकाला मारहाण

नगरमध्ये वाळू माफीयांची तहसीलदाराच्या वाहनचालकाला मारहाण 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

श्रीगोंद्यात वाळू माफीयांचा मुजोरपणा पहायला मिळाला आहे. वाळू माफीयाने बुधवारी रात्री तहसीलदाराच्या वाहनचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

चालक बाळासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दुचाकीवरून घरी जाताना अज्ञात तिघा तस्करांनी तोंडाला मास्क बांधून मारहाण करून धमकावले आहे. आमची वाळूची गाडी पकडून दिल्याने आम्हाला दोन ते तीन लाखाचा दंड झाल्याचे म्हणत मारहाण केली. परत वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्याने तालुक्मयात खळबळ उडाली असून कर्मचाऱयांवर भीतीचे सावट आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात काळय़ा फिती लावून कर्मचाऱयांनी निदर्शने केली. तहसील कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन छेडले आहे. तहसीलदार आणि प्रांतांना निवेदन देऊन वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुक्मयातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गौण खनिज पथकाची स्थापना केली. या पथकात चालक डोईफोडे यांचा समावेश आहे. या पथकाने दाणेवाडी, पेडगाव, निमगाव खलूत कारवाई करून वाहने जप्त केली. या कारवाईचा राग धरून डोईफोडेवर हल्ला करण्यात आला आहे.