|Saturday, October 19, 2019
You are here: Home » leadingnews » हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र-प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत केला उल्लेख

हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र-प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत केला उल्लेख 

ऑनलाईन टीम / नागपूर :

  • हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र-प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत केला उल्लेख

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत अशी अतिशोक्ती प्रणव मुखर्जी यांनी केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. स्मृती मंदिर या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत त्यांनी ही नोंद केली.

आता प्रणवदा आपल्या भाषणात नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळय़ा देशाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हेडगेवार जन्मस्थळाला भेट दिली. खरेतर प्रणव मुखर्जी यांच्या या नागपूर दौऱयाला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. प्रणव मुखर्जी यांनी या संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावू नये असेही काही दिग्गज नेत्यांनी सुचवले होते. सगळा विरोध झुगारून आणि टीका सहन करून प्रणव मुखर्जी या कार्यक्रमासाठी नागपुरात आले आहेत. आता त्यांच्या भाषणाला काही वेळातच सुरूवात होईल. मला जे काही बोलायचे आहे ते मी नागपूर येथील भाषणातच बोलेन असे प्रणव मुखर्जी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता ते नेमके काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.