|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गणवेषधारी विद्यार्थ्याना समुद्रकिनाऱयावर प्रतिबंध करा

गणवेषधारी विद्यार्थ्याना समुद्रकिनाऱयावर प्रतिबंध करा 

प्रतिनिधी/ मडगाव

नैसर्गिक सौदर्यामुळे जागतीक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी असलेल्या गोव्याच्या किर्तीला बेताळभाटी गँगरेप प्रकरणामुळे बाधा आलेली असून विद्यार्थ्याना समुद्रकिनाऱयावर गणवेष घालून येण्यास प्रतिबंध करण्यात यावा तसेच किनाऱयावरील झाडे व झुडूपे साफ करण्यात यावीत अशी विनंती प्रशानसनाकडे करण्यात आली आहे.

नुवे मतदरासंघाचे आमदार विल्पेड डिसा यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांकडे एक निवेदन सादर करुन अनेक मागण्या केलेल्या असून त्यातील ही एक मागणी आहे.

बेताळभाटी समुद्रकिनाऱयावरील सनसेट किनाऱयावर 24 मे 2018 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला पर्यटक म्हणून आलेल्या मध्य प्रदेशातील तीन नराधमानी एका 20 वर्षीय विद्यार्थीनीवर गँगरेप करण्याची घटना घडलेली होती आणि या घटनेनंतर संपूर्ण गोव्यात संतापाची एक लाट पसरलेली.

या दुर्दैवी घटनेनंतर बेतालभाटी पंचायतीने 31 मे रोजी एक बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीत परप्रांतीय पर्यटकांनी केलेल्या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला होता हे या निवेदनातून या लोकप्रतिनिधीने जिल्हाधिकाऱयांच्या नजरेला आणून दिले आहे.

या प्रकरणातील तिन्ही परप्रांतीय आरोपींवर गोव्यातच खटले चालविण्यात यावेत आणि पीडित युवतीला न्याय मिळवून द्यावा अशी बेताळभाटी पंचायतीचे सरपंच, उपसरपंच पंच सदस्य याच्यासह आपण मागणी करीत असल्याचे आमदार डिसा यांनी म्हटले आहे.

समुद्रकिनाऱयावर सीसीटीव्ही बसवावेत, पोलीस गस्त चालू करावी, इशारा देणारे फलक लावण्यात यावेत, समुद्रकिनाऱयाच्या प्रवेश केंद्रावर गेट उभारण्यात याव्यात, निर्वासितांची सक्तीने नोंदणी करण्यात यावी अशी सुचना आम. डिसा यांनी केली आहे.

समुद्रकिनारा सुशोभीत करण्यासाठीही आम. डिसा यांनी काही सुचना केलेल्या आहेत. चार दिवे असलेले हायमास्ट बसविण्यात यावेत, सोलर दिवे बसवावेत, समुद्रकिनारा साफ करण्यात यावेत तसेच झाडे व झुडूपे साफ करण्यात यावीत अशा काही सुचना केलेल्या आहेत.

समुद्रकिनाऱयावर कोणकोणत्या उपाय योजना करण्यात याव्यात याची शिफारसही त्यांनी ही संधी घेऊन केली आहे. गणवेष घालून समुद्रकिनाऱयावर येण्यास विद्यार्थ्याना मज्जाव करण्यात यावा यावर या लोकप्रतिधीने भर दिला आहे.

समुद्रकिनाऱयावर वाहन चालविण्यासही बंदी घालण्यात यावी शिवाय खुल्या जागी दारु पिण्यास प्रतिबंध केला जावा, समुद्रकिनारा साफ करण्यासाठी, समुद्रकिनाऱयाची देखभाल करण्यासाठी आणि समुद्रकिनाऱयावर नजर ठेवण्यासाठी नोकऱया तयार होतील त्यात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आणि समुद्रकिनारा साफ ठेवण्यासाठी सहलीसाठी येणाऱयांवर अंकूश ठेवण्यात यावा अशी शिफारसही या लोकप्रतिनिधीने प्रशासनाला केलेली आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाने समुद्रकिनाऱयावर अकस्मात तपासणी करण्यात यावी. यासंबंधी प्रशासनाने आपल्याकडे तसेच या प्रश्नावर आस्था दाखवित असलेल्या संघटनांबरोबर एक बैठक घडवून आणावी अशी विनंती आम. विल्पेड डिसा यांनी केली आहे.

Related posts: