|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » शेतीच्या वादातून दोन भावांची हत्या

शेतीच्या वादातून दोन भावांची हत्या 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :

शेतीच्या वादातून बुलडाण्यात दोन सख्या भावांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दहा ते बारा जणांच्या टोळक्मयाने काठय़ा आणि लोखंडी पाईपने मारहाण करून भावांचा जीव घेतला. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

बुलडाण्यातील जळका भंडग मधील कोंडे कुंटुंबीयांचा त्यांच्या शेताशेजारील दोन शेतकऱयांसोबत धुऱयावरून वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून आला. शेतात काम करत असताना 40 वषीय संतोष मारोती कोंडे यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढवला. भावावर हल्ला झाल्याचं पाहताच 35 वर्षांचा भाऊ वामन मारोती कोंडे मध्यस्थी करायला गेला, मात्र त्याच्यावरही कुऱहाड आणि काठय़ांनी जबर हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी जळका भंडग येथे दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पिंपळगाव राजा पोलिसांनी कोंडे यांच्या शेतानजीक शेती असलेल्या आणि हत्येचा आरोप असलेल्या भागवत आणि बुंधे ह्या दोन कुटुंबांतील सहा जणांना ताब्यात घेतले आहे.